Top News

अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्पाच्या वतीने कळमना येथे ऑक्सिजन पार्क निर्मिती साठी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न......

अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस  प्रकल्पाच्या वतीने कळमना येथे ऑक्सिजन पार्क निर्मिती साठी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न......



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा

    दिनांक २७/७/२०२२ रोज बुधवार ला कळमना येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन व ग्राम पंचायत कळमना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजन पार्क निर्मिती साठी वृक्षा रोपण करण्यात आले, पर्यावरनाचे संतुलन सारखण्या साठी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्पाच्या च्या माध्यमातून नव नवीन उपक्रम नेहमीच राबविले जातात, या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जन जागृती होत राहावी व पर्यावरणाच्या संतुलन साठी नेहमी कार्य करत राहावे, हा या उपक्रमा मागचा उद्देश,

     या प्रसंगी उत्तम कापूस प्रकल्पाचे समन्वय मा. सुभाष बोबडे सर यांनी  मार्गदर्शन करतांना म्हटले की, देशात घनदाट जंगलाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्या मुळे नियमित ऋतू नुसार पाऊस पडतं नाही त्याचा परिणाम शेतकरी व पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून वृक्षारोपण करून त्याचे जतन करणेने अत्यंत आवश्यक आहे.

   या कार्यक्रमा साठी अंबुजा फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्पाचे समन्वय मा. सुभाष बोबडे सर, राजुरा पंचायत समिती BDO हेमंत प्र. भिंगार्दिवे सर,, पि.यु. मॅनेजर सिद्धेश्वर जम्प्पलवर सर, पवान कुनघटकर सर,चंद्रकांत धानोरकर सर , प्रक्षेत्र अधिकारी अंबुजा फाउंडेशन साईनाथ पिंपळशेंड, प्रदीप बोबडे, हेमराज साळवे, कृषी सहायक पुरमचित्वाड सर, गावचे सरपंच नंदकिशोर वाढई, ग्राम सेवक नारनवरे साहेब, मुख्याध्यापक धनकुटे सर, सर्व ग्राम पंचायत सदस्य तंटा मुक्ती अध्यक्ष , महादेव ताजने, अंगण वाडी सेविका व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Previous Post Next Post