Top News

अवैध शस्त्र साठ्यासह 3 आरोपींना अटक.....

अवैध शस्त्र साठ्यासह 3 आरोपींना अटक.....


1 पिस्तौल , 2 देशिकट्टे, स्टील तलवार तसेच चक्र असलले 1 घातक शस्त्र जप्त.......



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा



 राजुरा पोलिस स्टेशन अंतर्गत दिवसेंदिवस गुन्हांचे प्रमाण वाढत असून राजुरा पोलिसांनी अवैध शस्त्रसाठा जप्त केल्याची धक्कादायक माहीती प्राप्त होत आहे. 

प्राप्त झालेल्या माहितीनुसार 25 जुलै रोजी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलीस चमूला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील सोमनाथ पूर वॉर्ड येथील तिघांनी बिहार राज्यातून घातक शस्त्र आणले असुन भविष्यात काहीतरी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गस्ती पथकाने मिळालेली माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवली व त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांच्या कुशल मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बहादुरे ह्यांच्या अचुक नियोजनात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्हि. दरेकर ह्यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक हिराचंद गव्हारे, नापोशी नागोराव भेंडेकर, नापोशी संदीप बुरडकर, पोशी रामा भिंगेवाड ह्यांच्या चमूने चातुर्याने संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्यांच्याकडे 1 पिस्तौल , 2 देशिकट्टे, स्टील तलवार तसेच चक्र असलले 1 घातक शस्त्र असल्याचे कबूल केले. 

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस चमूने लावजोत सिंग हरदेव सिंग देवल वय 18+ यांच्यासह विधिसंघर्ष बालकाला अपराध क्र. 304/22 अंतर्गत आर्म ऍक्टच्या कलम 3, 4, 25 अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक केली आहे.

Previous Post Next Post