संकल्प फाउंडेशन च्या माध्यमातून कुपोषित बालकांना आहार किट च वाटप....
ॲड. दिपक चटप यांचा ही सत्कार समारंभ.....
उत्पल गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम....
नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे तसेच संकल्प फाउंडेशन चे सक्रिय सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उत्पल भाऊ गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यातच संकल्प फाउंडेशन च्या माध्यमातून कुपोषित बालकांना साठी वरदान ठरत असलेली वाटचाल कुपोषणमुक्ती कडे या अभियाना अंतर्गत हिरापुर - निमणी गावातील कुपोषित बालकांना आहार किट च वाटप करण्यात आले, तसेच नुकत्याच ब्रिटिश सरकारने जाहीर केलेल्या चेव्हनिंग स्कॉलरशिप मध्ये आपल्या च भागातील लखमापुर टु लंडन असा प्रवास करणाऱ्या दिपक चटप यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुकत्याच लागलेल्या दहावी बोर्डच्या निकालामध्ये हिरापुर येथिल साहिल कवढु घटे यांनी 85.00% घेतल्याबद्दल त्याचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. वेळी अॅड. दिपक चटप यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की परिस्थिती वर मात करुण स्वताला घडवा. परिस्थिती माणसाला घडवत ही नाही आणी परिस्थिती माणसाला बिघडवत हि नाही माणुस च आपल्या चांगल्या वाईट काळाला जबाबदार असतो. या वेळी दिपक नि आवर्जून सांगितले की शैक्षणिक क्षेत्रात किंवा समाजिक क्षेत्रात जर काम करायच असेल तर मी सदैव तुमच्या सोबत आहे. या प्रसंगी प्रामुख्याने मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे सर, कपील भाऊ इद्दे, सत्कार मुर्ती दिपक चटप,माजी पोलिस पाटिल श्री. दादाजी पा. गोरे, त. मु.अध्यक्ष श्री शामरावजी कोडापे,पोलिस पाटिल श्री उमेशजी देठे, मुख्याध्यापक श्री भानुदासजी देवाळकर,शिक्षक श्री कुळसंगे सर,शा. व्य.अध्यक्ष श्री मनोज गोरे, संकल्प फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरज गव्हाने, निमणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रफुलभाऊ मोरे, श्री प्रविणभाऊ गोबाड़े उपस्तिथी होते । कार्यक्रमाच्या यशश्वी करीता राज कोंडेकर,अनिकेत पारखी,निखिल देठे,स्मितिल गोरे, छगन पोतराजे, साहिल घटे, कपिल लोहे,स्वप्नील गोरे यांनी सहकार्य केले.

