Top News

युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांच्या मागनीला यश......

युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांच्या मागनीला यश......


पालकमंत्री संदिपान भुमरे नी दिला अडेगाव विकासासाठी  35 लक्ष रुपयांचा खनिज विकास निधी......


युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी केली होती मागणी



विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव


यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम तालुक्यातील अडेगाव येथे गौनखनिज खदानी मोठ्या प्रमाणात आहे याचं  अडेगाव गावातून शासनाला मोठा खनिज निधी सुद्धा उपलब्ध होतो पण गौणखनिज व्यापलेले गावात खनिजचा निधी खर्च केल्या जात नव्हता हाच मुद्दा घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे व जिल्हाधिकारी यांच्याकडे अडेगाव विकासाठी खनिज निधी उपलब्ध करून देण्याबाबत युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी वारंवार मागणी लाहून धरली अखेर खनिज विकास निधी अंतर्गत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी अडेगाव विकासासाठी 35 लक्ष रुपये मंजुरात केली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

यात भव्य 20 लक्ष रुपयाचे  वाचनालय सोबत 10 लक्ष रुपयांचे  प्रीतम लोढा ते किशोर काटकर याच्या घरा पर्यंत सिमेंट रोड व 5 लक्ष रुपयाचे जिल्हा परिषद शाळा अडेगाव साठी भींत बांधण्यात येणार असल्याचे सरपंच सीमा लालसरे यांनी सांगतीले या पूर्वी सुद्धा  पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी अडेगाव खडकी रस्त्या साठी 3 कोटी 32 लक्ष मंजुरात दिली होती, सोबतच गावातील मातोश्री पांदण रस्ते सुद्धा मंजूर केले होते युवा नेते मंगेश पाचभाई वारंवार पत्र व्यवहार करून मागणी लाऊन धरत असतात व परिसरातील समस्या चे निवारण करत असतात हे  विशेष‌‌....

Previous Post Next Post