बल्लारशाह - आलापल्ली मार्गावरील बामनी येथे भिषण अपघात.....
कॅप्सुल ट्रकची दुचाकीला धडक........ एका व्यक्तीचा जागीच मृत्यू.......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
भरधाव वेगाने येणाऱ्या कॅप्सूल ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली या भिषण अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बल्लारशाह तालुक्यातील बामणी येथे झाला.
या भिषण अपघातात 35 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असुन सदर मृतक व्येक्ती नजीकच्या दहेली येथील रहीवाशी आहे अपघाता मृत पावलेल्या यूवकाचे नाव अजय वागदरकर असुन युवकाला भरधाव वेगाने येणाऱ्या कॅप्सूल ट्रक ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
सदर युवक का वैयक्तिक कामानिमित्त बल्लारशाह कडे येत असतांना हा अपघात घडला असुन त्याचे जागीच निधन झाले. अपघाताची माहिती मिळताच बल्लारशाह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कॅप्सूल ट्रक ला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास बल्लारशाह पोलीस करीत आहे.
