Top News

CRPF च्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; ३ जवान शहीद

CRPF च्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; ३ जवान शहीद



विदर्भ माझा न्युज 24 - नौपाडा

छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील नौपाडा येथे सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याती तीन जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून सीआरपीएफ १९ बटालियनच्या आरओपी पार्टीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सीआरपीएफची टीम ओरिसाच्या नौपाडा जिल्ह्यात रस्ते बांधणीचे काम करीत असलेल्या लोकांना सुरक्षा पुरवण्यासाठी निघाली होती. मात्र, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला.

यापूर्वी एकदा छत्तीसगडमध्ये वर्षभरापूर्वी विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये २२ जवान शहीद झाले होते. त्यानंतर २०० ते ३०० नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवादी कमांडर हिडमाला पकडण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान गेले होते. मात्र, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी तीन बाजूंनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला व रॉकेट लाँचरही सोडले होते. तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता.

Previous Post Next Post