जिल्ह्यातील 3619 विद्यार्थी देणार नीट ची परीक्षा.....4 मे 2025 रोजी 9 केंद्रावर होणार परीक्षा

 जिल्ह्यातील 3619 विद्यार्थी देणार नीट ची परीक्षा.....4 मे 2025 रोजी 9 केंद्रावर होणार परीक्षा


चंद्रपूर : रविवार, दि. 4 मे 2025 रोजी जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर NEET (UG) ची परीक्षा होणार असून जिल्ह्यातील 3619 विद्यार्थी या परिक्षेला बसणार आहेत.

नीट (यूजी) उमेदवारांसाठी सूचना : हे करा : प्रवेशपत्रात दिलेल्या परीक्षेचा योग्य पत्ता, केंद्र  गाठले आहे की नाही, यांची पडताळणी करा. मुख्य गेटवर आपले ओळखपत्र आणि प्रवेश पत्र दाखवा. कृपया तपासणी साठी  सुरक्षा कर्मचाऱ्याला सहकार्य करा. केंद्राबाहेर दर्शविलेल्या आसन योजनेसह आपला रोल नंबर, केंद्र क्रमांक, खोली क्रमांक तपासा. ॲडमिट कार्डची हार्ड कॉपी, पोस्टकार्ड साइज फोटो प्रिंट कॉपी सोबत ठेवा. केंद्रात पारदर्शक पाण्याच्या बाटलीला परवानगी आहे. केंद्रात प्रवेशाच्या क्रमाचे अनुसरण करा (बाण  चिकटवलेले). तपासणी, नोंदणी आणि बायोमेट्रिक मधून जा आणि परीक्षा कक्षात पोहोचा. परीक्षा केंद्रात सकाळी 11 ते दुपारी  1.30 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रवेश आहे.

हे करू नका : उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात  खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नाही. शिवाय, उमेदवाराने आणलेल्या कोणत्याही वस्तूच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा केंद्र जबाबदार नाही.

पाठ्यपुस्तकसामग्री मुद्रित किंवा लिखित, कागदांचे तुकडे, भूमिती/ पेन्सिल बॉक्स,प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, रायटिंग पॅड, पेनड्राइव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन/स्कॅनर इत्यादि कोणतीही स्टेशनरी वस्तू, मोबाइल फोन, ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थबँड इत्यादि कोणतेही कम्युनिकेशन डिव्हाइस, वॉलेट,गॉगल्स, हॅडबॅग्ज, बेल्ट कॅप इत्यादि इतर वस्तु कोणतेही घडयाळ/मनगटी घडयाळ, ब्रेसलेट, कॅमेरा इ. कोणतेही दागिने, कोणतीही खाण्यायोग्य  वस्तू उघडलेली किंवा पॅक केलेली वगैरे. मायक्रोचिप, कॅमेरा ब्लूटूथ डिव्हाइस इत्यादि संप्रेषण साधने लपवून अनुचित सांधनासाठी वापरली जाणारी इतर कोणतीही वस्तू.

केंद्रात कोणत्याही उमेदवाराकडे प्रतिबंधित वस्तूपैकी कोणतीही वस्तू आढळल्यास ती अनुचित मार्गाचा वापर  मानली जाईल आणि संबंधित तरतुदींनुसार उमेदवारावर कारवाई केली जाईल.

परीक्षा केंद्र व पार्किंग व्यवस्था

  • 1) केंद्रीय विद्यालय डब्ल्यूसीएल दुर्गापूर, चंद्रपूर (पार्किंग - शाळेच्या गेटसमोरील ग्राऊंडवर) 
  • 2) पी.एम. श्री. केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्ट्ररी चांदा, भद्रावती (समोरील मार्केट परिसर) 
  • 3) गर्व्हमेंट कॉलेज आॉफ इंजिनियरींग, चंद्रपूर (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) 
  • 4) डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स, चंद्रपूर (चांदा क्लब ग्राऊंड)
  •  5) नारायणा विद्यालय, पडोली चंद्रपूर (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी)  
  • 6) इंदिरा गांधी गार्डन स्कूल, रामनगर चंद्रपूर (संत्रा मार्केट)
  •  7) श्री. महर्षी विद्या मंदीर, चंद्रपूर (शाळेच्या गेटसमोरील ग्राऊंडवर) 
  • 8) माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) आणि 
  • 9) राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरींग रिसर्च ॲन्ड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर. (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी)