स्व. बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावा आमदार कीशोर जोरगेवार यांची मागनी......
👉🏻हे ही वाचा.... लोकप्रिय खासदार बाळु धानोरकर काळाच्या पळध्या आड.......
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
खासदार बाळू धानोरकर यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे.
हे ही वाचा.... खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल.....
ही बाब लक्षात घेता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पाठविण्यात आले आहे.
👉🏻हे ही वाचा.... लोकप्रिय खासदार बाळु धानोरकर काळाच्या पळध्या आड.......
चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांचे आज मंगळवारी दुखःद निधन झाले आहे. ते सन २०१४ मध्ये वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेना पक्षाचे आमदार होते.
हे ही वाचा.... खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल.....
त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
👉🏻हे ही वाचा.... लोकप्रिय खासदार बाळु धानोरकर काळाच्या पळध्या आड.......
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार बुधवार, दिनांक ३१.०५.२०२३ ला वरोरा येथे करण्यात येणार आहे. त्यांनी भूषविलेले संविधानिक पद तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कर्तुत्व आणि अतुलनीय योगदान लक्षात घेता त्यांची अंत्यविधी ही शासकीय इतमामात करणे अपेक्षित असल्याचे सदर निवेदनात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून दिवंगत खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याकरिता तातडीने व्यवस्था करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
👉🏻हे ही वाचा.... लोकप्रिय खासदार बाळु धानोरकर काळाच्या पळध्या आड.......