विदर्भ कन्या माता रूक्मिणी ला कौंडण्यपूरात घालनार विदर्भवादी साकडे !
विदर्भ राज्य आंदोलन समिती काढनार आष्टी ते कौंडण्यपूर पदयात्रा.......
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'विदर्भ राज्य मिळवू यंदा' याकरिता ३१ डिसेंबर २०२३ ला करू किंवा जेलमध्ये जाऊ' अशी घोषणा केली होती. आता या आंदोलनाला आणखी तीव्र करण्याकरिता आणि पुढील रणनीती ठरण्याकरिता वर्ध्यात आज कोअर कमिटीची बैठक पार पडली.
यामध्ये ३० सप्टेंबर रोजी आष्टी (शहीद) येथून विदर्भ संकल्प पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पदयात्रा तळेगाव-आर्वी कौंडण्यपूर अशी जाणार असून, २ ऑक्टोबरला रुक्मिणीला साकडे घालून विदर्भ संकल्प महिला मेळावा आयोजित केला जाणार असल्याचे माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून आंदोलन तीव्र करून घटनेतील कलम ३ प्रमाणे सरकारला विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरिता भाग पाडणार. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याची ११८ वर्षांची मागणी कायमस्वरूपी निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणूनच वर्ध्यातील कोअर कमिटीच्या सभेत २८ सप्टेंबरला विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक असणाऱ्या नागपूर कराराची होळी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये केली जाईल. तसेच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक असलेल्या आष्टीतून विदर्भ संकल्प यात्रा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहनही या बैठकीतून करण्यात आले.
या बैठकीला ॲड. वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. आशिष ठाकरे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, पद्माकर भांदक्कर, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुम्बवार, राजेंद्र आगरकर, प्रकाश लड्ढा, दिनकर पाटील निस्ताने, दिलीप भोयर, कैलास फाटे, गजानन अहमदाबादकर, सतीश दाणी, सचिन डाफे, राजेंद्रसिंह ठाकूर, समीर शिंदे, राज ठाकूर, कपिल इद्दे, रमेश नळे, मनोहर गेडाम, अशोक पटले व विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.




