Top News

Immediately complete the work of all the dilapidated Zilla Parishad schools in Washim district and provide suitable Zilla Parishad schools for the students after inspection - Gopal Bhisde

वाशिम जिल्ह्यातील नाद्रूस्त जीर्ण झालेल्या सर्व जिल्हा परिषद शाळेचे काम तात्काळ पूर्ण करा व प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांला बसन्या योग्य जिल्हा परिषद शाळा उपलब्ध करून द्याव्या - गोपाल भिसडे



  विदर्भ माझा न्युज 24 - वाशिम  

वाशिम जिल्ह्यातील  नाद्रूस्त जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळेचे काम तात्काळ पूर्ण करणे बाबत,व प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांना बसन्या योग्य जिल्हा परिषद शाळा उपलब्ध करून देणे बाबत विविध मागणी सह संपूर्ण जिल्हातील पालकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांचे CEO वाशिम यांना जिल्हातील विद्यार्थी पालक वर्गाच्या वतीने निवेदन दिले आहे.


  वाशिम जिल्ह्यातील अनेक खेडोपाडी जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झालेली आहे, सदर काही शाळा पडण्याच्या मार्गावर आहेत कधीही विद्यार्थ्यांची जीवित हानी होऊ शकते, विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची इजा झाल्यास  याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील व शासनानी विद्यार्थ्यांच्या जीवाची हमी घ्यावी अन्यथा वाशिम जिल्ह्यातील  जेवढे नादुरुस्त पडक्या जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी,


त्यांचे काम तात्काळ पूर्ण करावे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची शाळा उपलब्ध करून द्यावी विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य  शाळा उपलब्ध करून द्यावी, आणि कमी दिवसात निकृष्ट बोगस दर्जाच्या झालेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करून संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी, व जिल्हातील जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न मार्गी लावावा असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी दिले आहे.

Previous Post Next Post