आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांची चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे विरांगणा मुग्दाई जयंती-नागदिवाळी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील माँ माणिका देवी मंदिर, देवस्थान मालेवाडा येथे विरांगणा मुग्दाई जयंती-नागदिवाळी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
यावेळी सर्वप्रथम माँ मुग्दाई माता, माँ माणिका देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच, उपस्थितांना विविध विषयांवर संबोधित करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आमदार बंटी भांगडीया यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर,
भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम चिडे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ममता डुकरे, भाजपा नेते योगेश नाकाडे, प्रवीण जिवतोडे, बंडू ओलिया महाराज, काशिनाथ गजभिये, घोडमारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.



