भावी पिढी सिकलसेल मुक्त करण्यासाठी सिकलसेल निर्मूलन मिशन विविध विभागाच्या समन्वयाने यशस्वी करा. - आमदार कीशोर जोरगेवार
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन मिशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोर्गेवार उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. एकेकाळी पोलिओ हा मोठा आजार होता. पोलिओ मुक्त भारत अभियान राबवत या आजारावर आपण मात मिळविली आहे. आता सिकलसेल निर्मूलनासाठी केंद्रात मोदी सरकार प्रयत्नशील आहे. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पूढाकार घेतला असून भावी पिढी सिकलसेल मुक्त करण्यासाठी सिकलसेल निर्मूलन मिशन विविध विभागाच्या समन्वयाने यशस्वी करणे गरजेचे आहे. कार्यक्रमात डॉ. मंगेश गुलवाळे आणि ब्रीजभूषण पाझरे सह अन्य माण्यवरांची उपस्थिती होती.

