Top News

Advocacy of successful police exam students Vamanrao Chatap felicitated.....

पोलीस परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा ॲड. वामनराव चटप यांनी केला सत्कार.....




 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 



                मुंबई पोलीस विभागाच्या सन 2021 च्या शिपाई पदाच्या परीक्षेत राजुरा येथील तीन मुलींनी यश प्राप्त  केले असून त्यांची निवड मुंबई पोलीस दलात झाली आहे. अत्यंत गरीब घरच्या या विद्यार्थिनी असून शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या यशस्वी विद्यार्थिनींच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वच स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवित आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब असून आपल्या ध्येयासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरात सफलता नक्कीच प्राप्त होते, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

       


       राजुरा येथील बेघर वस्तीतील कु.सुवर्णा शंकर नाईकवार, इंदिरानगर येथील कु.आंचल देवाजी सरवर, भेदोडा येथील कु. पुजा सतीश इंदूरवार या तीन विद्यार्थिनी मुंबई पोलिस शिपाई पदाच्या सन 2021 मध्ये घेतलेल्या परीक्षेत यशस्वी झाल्या आहेत. छत्रपती क्रिडा अकॅडेमी चे प्रशिक्षक पाशा शेख यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले होते. या यशस्वी उमेदवारांच्या घरी जाऊन माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बाजार समितीचे संचालक प्रभाकर ढवस व दिलीप देठे, माजी नगरसेवक दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर, विदर्भ आंदोलन समितीचे उपाध्यक्ष कपिल ईद्दे, नरेंद्र मोहारे यांनी सत्कार केला. यावेळी संगीता सरवर, सुरेखा नाईकवार, शंकर नाईकवार, शुभांगी सरवर, आकाश येलचेलवार, प्रिती येलचेलवार इत्यादी उपस्थित होते.


Previous Post Next Post