मौजा वाघोली येथे वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या महिलेच्या घरी सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने यांची सांत्वनपर भेट......
सावली तालुका काँग्रेस कमिटी दुःखात सहभागी, वारंवार वाघाच्या हल्यात निष्पाप लोकांचा जीव जाण्याचा घटनामुळे लोकांत भीतीचे वातावरण-- नितीन गोहणे,तालुका काँग्रेस अध्यक्ष यांची मागणी
विदर्भ माझा न्युज 24 - सावली
तालुक्यातील, मौजा. वाघोली येथे ममता बोदलकर नामक या महिलेवर शेतात काम करीत असताना वाघाने हिंसक हल्ला करीत ठार केले.मागील काही महिन्यापासून तालुक्यात अश्या कित्येक हिंसक घटनामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.त्यातच चकविरकलं येथील घटनेनंतर वाघोली येथे झालेल्या हल्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे,लोक वाघाच्या भीतीने दिवसासुद्धा बाहेर पडताना घाबरत आहेत, एन दुपारी शेतात काम करताना वाघाने हल्ला चढवीत महिलेला ठार केले, माणसाच्या जीविताच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाघोली येथे वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या महिलेच्या घरी सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने यांनी सांत्वनपर भेट दिली व मृतकाचा कुटुंबाला मोठ्या भावाप्रमाणे आधार दिला. व त्यांना आर्थिक मदत प्रदान केली.
या वेळी "तालुक्यात सातत्याने वाघाच्या हल्यात निष्पाप लोकांना बळी जात आहे, सांत्वन करून अश्रू पुसल्या जातील पण एकदा गेलेला माणूस परत येणार नाही, मी आणी सावली तालुका काँग्रेस कमिटी दुःखात सहभागी आहोत असे प्रतिपादन नितीन गोहणे,तालुका काँग्रेस अध्यक्ष यांनी सांत्वनपर भेट देताना मृत महिलेच्या कुटुंबियांना धीर देताना केले.
सांत्वनपर भेट देताना जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते गणपत बोरकुटे व जयंत संगिडवार, तसेच टिकाराम रोहणकर अध्यक्ष ग्राम काँग्रेस कमिटी वाघोली, नरेश पाटील गड्डमवार उपसरपंच ग्रामपंचायत बोथली,पितांबर वासेकर माजी सरपंच व्याहाड बुज, सुनील बोमनवार अध्यक्ष किसान राईस मिल व्याहाड बुज,यशवंत रोहणकर,धनराज भांडेकर ग्रामपंचायत सदस्य,प्रकाश बोरकुटे,दामोदर भांडेकर,मुकुंदा रोहणकर,विनोद भांडेकर,कालिदास गेडाम व्याहाड बुज,यादव सातपैसे व्याहाड बुज आदी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
