Top News

बल्हारशाह पोलिस स्टेशन येथे पार पडला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ....

बल्हारशाह पोलिस स्टेशन येथे पार पडला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ.... 


मुख्याधिकारी विजय देवळीकर व तहसीलदार संजय राईचंवार बल्हारशाह यांच्या सेवानिवृत्ती पर बल्हारशाहतील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार !



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 


 वर्तमान काळात नौकरी मिळणे फार जिकरीचे काम त्यातही मिळालेली नौकरी टिकविणे सुध्दा महत्वाचे विशेष म्हणजे प्रशासकीय स्तरावर काम करताना अधिकाऱ्याला वारंवार नवनवीन ठिकाणी सेवा द्यावी लागते. त्यामुळं चांद्यापासून बांद्या पर्यंत नौकरी करताना मात्र आम्हाला बल्हारशाह शहरात सर्व समाज घटकांनी सर्वतोपरी सहकार्य केले मग ती पूर परिस्थिती असो वा कोरोनाच्या दोन्ही लाटामध्ये लाभलेलं सहकार्य असो असे उदगार आपल्या सेवानिवृत्ती पर सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलताना बल्हारशाह चे तहसीलदार संजय राईचंवार,  व बल्हारशाह नगर परिषद चे मुख्याधिकारी विजय देवळीकर यांनी व्यक्त केले.

        बल्हारशाह शहरातील प्रशासकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले संजय राईंचवार तहसीलदार बल्हारशाह व  विजय देवळीकर मुख्याधिकारी न.प.बल्हारशाह यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बल्हारशाह पोलिस निरीक्षक  उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ काँग्रेस नेत्या डॉ. रजनी हजारे, व प्रमुख अतिथी म्हणुन चंदनसिह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, डॉ. विजय कळसकर वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय बल्हारशाह, किरणकुमार धनावडे गट विकास अधिकारी, बल्हारशाह, वैभव जोशी शाखा अभियंता सा.बा.वि.बल्हारशाह, उमेश पाटील पोलिस निरीक्षक, बल्हारशाह, घनश्याम मुलचंदानी माजी नगराध्यक्ष बल्हारशाह, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, सहाय्यक  पोलिस निरीक्षक प्रमोद रासकर , सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तिवारी ई. ची व्यासपिठावर उपस्थिती होती. 

यावेळी विविध सामाजिक संघटना, वैद्यकीय अधिक्षक, पत्रकार संघ, विविध राजकीय पक्ष तसेच पोलिस विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी अनेक मान्यवरांनी सत्कारमूर्तीच्या स्वागतानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केल या कार्यक्रमाचं संचालन श्रीनिवास सुंचूवार तर आभार प्रदर्शन सपोनी ठाकरे यांनी केले.

Previous Post Next Post